आदर्श ग्रामसेवक कृष्णाजी दळवी यांचा सत्कार!

आदर्श ग्रामसेवक कृष्णाजी दळवी यांचा सत्कार!

मसुरे /-

राज्य शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल पोईप गावचे सुपुत्र व बुधवळे आणि आडवली ग्रामपंचयतीचे ग्रामसेवक कृष्णाजी दळवी यांचा मालवण पंचायत समिती येथे सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते. शासनाच्या विविध योजना ग्रामस्तरावर राबवताना ग्रामसेवक कृष्णाजी दळवी घेत असलेली मेहनत कौतुकास्पद असते. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्यामुळे मालवण तालुक्याला बहुमान प्राप्त झाला असल्याचे सभापती अजिंक्य पाताडे यांनी सांगितले. मान्यवरांनी दळवी यांचे अभिनंदन केले.

अभिप्राय द्या..