कुडाळ /-

बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयांमध्ये डॉक्टर संजय ओक यांचे ई प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. “कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे .प्राप्त परिस्थितीमध्ये कोरोना पासून वाचण्यासाठी *मी जबाबदार* ही जबाबदारी पार पाडण्याची मानसिकता लोकांमध्ये रुजविणे अत्यावश्यक आहे.” असे उद्गार महाराष्ट्र राज्य कोविड टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉ.संजय ओक यांनी काढले.

ते बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालय कुडाळ मध्ये आयोजित कार्यक्रमात *कोरोना ची दुसरी लाट- लसिकरण समज-गैरसमज आणि उपाय* या विषयावर ई प्रणालीद्वारे उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये” कोरोना ची आलेली दुसरी लाट आणि त्याचा होणारा प्रादुर्भाव” या विषयानुषंगाने बोलताना ते पुढे म्हणाले’ पहिल्या लाटे पेक्षा दुसऱ्या लाटेचा संसर्ग आणि मृत्यू दर जास्त आहे.कोरोना वेगाने पसरत आहे. या गोष्टीकडे गांभीर्याने बघण्याची नितांत गरज आहे.लसिकरण गरजेचं आहे. मात्र लसीकरणाबाबत लोकांमध्ये हवी तेवढी जागृकता आलेली नाही. लसीकरणाबाबत ऐकीव माहितीवर लक्ष न देता खात्रीने ही लस घेणे ,मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे .याबाबतची जागरुकता लोकांमध्ये रुजवण्याची गरज आहे आणि त्यासाठी विद्यार्थी व महाविद्यालयाने पुढाकार घेऊन पथनाट्य, नाटुकले,नाटक, वक्तृत्व ,रांगोळी स्पर्धा सारख्या स्पर्धांच्या माध्यमातून जनजागृती करून लसीकरण करण्याच्या गरजेचे प्रतिपादन केले.

लसीकरण हे शरीराला हानिकारक नसून रोगप्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी महत्त्वाचे आहे. धोकादायक वयोगटात लसीकरणाबाबत सजग असणे गरजेचे आहे. असे सांगत कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने उमेश गाळवणकर यांची बॅ .नाथ पै शिक्षण संस्था पुढाकार घेत आहे ,हे फार कौतुकास्पद आहे .असा पुढाकार समाजातील अनेक संस्था आणि व्यक्तींनी व महाविद्यालयांनी घेतल्यास कोरोना व या लसीबाबत जागृती निर्माण होऊ शकते .कोरोना हद्दपार होऊ शकतो.असे सांगत आजच्या काळात जनजागृती चे असे उपक्रम घेणे फार गरजेचे असल्याचे सांगत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे त्यांनी योग्य निराकरण केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ मीना जोशी,उप प्राचार्या सौ.कल्पना भंडारी तसेच प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी बहुसंख्येने सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page