सिंधुदुर्ग /-
कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक वावरावर अनेक बंधने घातली आहेत. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे . शासनाच्या कडक निबंधांमुळे लहान मोठे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत . गेल्या वर्षभरात कोलमडलेल्या आर्थिक स्थितीमुळे व्यावसायिकांसमोर कर्जाचे डोंगर उभे राहीले आहेत . या परिस्थितीतून मानवतेच्या दृष्टीने विचार करून मार्ग काढणे अत्यंत जरूरीचे आहे . सद्या शासन नियमांची अमंलबजावणी करत असताना व्यापारी वर्गावर सक्ती केली जात आहे . त्यामुळे असंतोष निर्माण होत आहे . तरी शासन निर्णयांची अमंलबजावणी करताना कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी पत्राद्वारे पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे केली आहे.