शिरंगे येथील काळ्या दगडांच्या खाणींन मुळे होतंय काजू बागायतदारांचे नुकसान..

शिरंगे येथील काळ्या दगडांच्या खाणींन मुळे होतंय काजू बागायतदारांचे नुकसान..

कुडाळ /-

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाच्या लगतच काळ्या दगडाच्या खाणींचे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असून काही काळ्या दगडाच्या खाणी ह्या बेकायदेशीर रीत्या सुरु आहेत, ह्या काळ्या दगडाचे खाणींचे उत्खनन हे तिलारी धरणापासून अगदी लगतच्या अंतरावर असून सबंधित ठेकेदार आपल्या काळ्या दगडाच्या खाणींतून काढण्यात येणारे मातीचे ढिगारे हे रस्त्यालगतच टाकत असुन तसेच हा रस्ता शिरंगे पुनर्वसन गावातील काजू बागायतदारांच्या बागेत जाण्यासाठी एकमेव रस्ता असून रस्त्यालगत टाकण्यात आलेले मातीचे ढिगारे हे पावसाळ्यात रस्त्यावर कोसळले जातात, त्यामुळे शिरंगे पुनर्वसन मधील काजू बागायतदारांना आपल्या काजू बागायतीत जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्याने पावसाळ्यात हा रस्ता मातीचे ढिगारे कोसळून बंद केला जात असल्याने त्यांना आपल्या काजु बागायतींच्या कामांसाठी काजु बागायतीत जाता येत नाही, म्हणून काजु बागायती मधील शेतकऱ्यांनी सबंधित काळ्या दगडाच्या खाणींच्या ठेकेदारांना मातीचे ढिगारे काढण्यास सांगितले असता,ठेकेदारांकडून उडवाउडवीचे उत्तरे आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे, संबंधित उत्खनन हे धरणापासून लगत असून बेकायदेशीर रित्या देखील सुरू आहे तरीसुद्धा ठेकेदारांन कडून अरेरावीची भाषा केली जाते तसेच बेकायदेशररित्या सुरु असलेल्या उत्खननाची शासनाने दखल घ्यावी अन्यथा बेकायदेशीर रीत्या सुरु असलेल्या काळ्या दगडाच्या खाणी विरोधात उपोषण केले जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

अभिप्राय द्या..