वादळी ठरलेल्या या बैठकीत उपसरपंचासह ४ सदस्यांचा सभात्याग..
वेंगुर्ला /-
वेंगुर्ले तालुक्यातील केळूस ग्रामपंचायतीची दिनांक २६ मार्च रोजी कोरम अभावी तहकूब झालेली मासिक बैठक काल ३१ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली या सभेत सरपंचासह आठ सदस्य उपस्थित होते. यावेळी सदस्य ममता कसालकर आणि सदस्य कमलाकर वेंगुर्लेकर यांनी ग्रामसेवक व सरपंचाला धारेवर धरत अनेक प्रश्नांची सरबत्ती केली,मासिक बैठकीच्या इतिवृत्तात खाडाखोड असते, विकास कामांची माहिती सदस्यांना देण्यास टाळाटाळ केली जाते,सरपंच यांच्याकडून विकासकामांत जाणिवपूर्वक दुजाभाव केला जातो, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणांची कल्पना सदस्यांना प्रशिक्षण दिवशी दिली जाते,सरपंच व ग्रामसेवक यांचेकडून सदस्यांना विचारात न घेता एकतर्फी निर्णय घेतले जातात, मासिक बैठकीत घेतलेल्या ठरावांची इतिवृत्तात नोंद असूनही त्याची पूर्तता कित्येक महिने केली जात नसल्याचा आरोपही या बैठकीत सदस्यांकडून करण्यात आला.सदस्य ममता कसालकर आणि सदस्य कमलाकर वेंगुर्लेकर यांनी मांडलेले विषय आणि घेतलेली भूमिका हि वस्तुस्थितीला धरुन असल्याने उपसरपंच आबा खवणेकर,सदस्य रश्मी कसालकर,सदस्य वेदिका खवणेकर यांनीही ही यास सहमती दर्शवत एकुण उपसरपंचासह चार सदस्यांनी या सर्वाचा निषेध म्हणून सभात्याग केला.