साटेली भेडशी येथे आढळला मृत अवस्थेत गवारेडा..

साटेली भेडशी येथे आढळला मृत अवस्थेत गवारेडा..

दोडामार्ग /-

दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथे आज सकाळी मृत अवस्थेत गवारेडा आढळून आला.गवा रेड्याचा मृत्यू हा शिकार करूनच झाला असावा,अशी दबक्या आवाजात बाजारपेठत चर्चा सुरू आहे,कारण यापूर्वी ही असाच प्रकार त्या भागात घडला होता.वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्याचा काय पंचनामा रिपोर्ट येतो,त्यावरून मृत्यू चे नेमके कारण समजेल.मात्र वन्य प्राण्यांच्या अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्राणीमित्रांमधून मात्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अभिप्राय द्या..