सावंतवाडी /-
सद्गुरु साटम महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे आमची एकजूट मासिकाने त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा सलग बाविसावा विशेषांक आज मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित केला यावेळी उपस्थित मान्यवरांनी संपादक सिताराम गावडे यांच्या उपक्रमाची कौतुक करून खऱ्या अर्थाने मोबाईल युगात अडकलेल्या तरुणांना भक्तिमार्गाकडे वळविण्यासाठी सद्गुरु साटम महाराज यांचा अंक कथा रूपात उपयुक्त ठरेल असा विश्वास प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी व्यक्त केला.
पाटील कॉम्प्लेक्स मधील रत्नेश प्लाझा मध्ये हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर ,सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासो बाबर, बालरोगतज्ञ डॉक्टर दत्ता सावंत, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, सह संपादिका सौ संयुक्ता गावडे,माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, सुनिल पेडणेकर, सकाळचे आवृत्ती प्रमुख शिवप्रसाद देसाई ,दैनिक रत्नागिरी टाईम्स लोकसत्ताचे प्रमुख प्रतिनिधी अभिमन्यू लोंढे, पुढारीचे सावंतवाडी प्रतिनिधी हरिश्चंद्र पवार, ग्लोबल महाराष्ट्र चे प्रसन्ना गोंदावळे,शैलेश शैलेश मयेकर, आमची एकजूट चे कार्यकारी संपादक प्रशांत बिरोडकर उपस्थित होते.
सद्गुरु साटम महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्रेमासिक आमची एकजूट गेली बावीस वर्ष अविरतपणे महाराजांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा कथा रूपात विशेषांक प्रकाशित करते या विशेषांकाचे प्रकाशन आज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले, यावेळी बोलताना प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी आमची एकजूट चे संपादक सीताराम गावडे यांच्या या उपक्रमाचे स्वागत करून तरुण पिढी मोबाईल युगात अडकलेली आहे, वाचन संस्कृती कमी झाली, त्यामुळे सद्गुरूंच्या अशा कथा तरुणांच्या वाचनात आल्या तर वाचनाची आवड वाढेल व सद् मार्गाकडे पिढी वळेलअसा विश्वास व्यक्त करून साटम महाराजांचा शंभरावा विशेषांकही सिताराम गावडे यांच्या हातून प्रकाशित व्हावा अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त केल्या
तर सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासो बाबर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून, महराजांची महती सर्वदूर पोहचविण्याचे काम करीत आहेत ते असेच सुरु रहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
डॉ दत्ता सावंत यांनी आपले रुग्णालय हे साटम महाराज बाल रुग्णालय म्हणून सुरू केले ,देशातील असे महाराजांच्या नावाने सुरु झालेले पहिले रुग्णालय आहे, आणि प्रकाशन कार्यक्रमाला मी दरवर्षी न चुकता हजर असतो,साटम महाराजांचा शंभरावा विशेषांकही प्रसिद्ध व्हावा अशा शुभेच्छा दिल्या.
उपनगराध्यक्ष सौ अन्नपूर्णा कोरगावकर यांनी त्रेमासिक आमची एकजूट गेली बावीस वर्षे अविरतपणे साटम महाराजांच्या जिवनकार्याचा आढावा घेणारा विशेषांक प्रसिद्ध करत आहे.आमची एकजूट नावातच सर्व काही काही मी राजकारणात असेन अथवा नसेन पण आमची एकजूट च्या प्रकाशनला बोलवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सीताराम गावडे यांचे लिखाण सडेतोड आहे. अशी किती तरी आंदोलने सीताराम गावडे यांच्या लेखणीतून उभी राहिली,अध्यात्मीक लिखाण सलग वीस वर्षे करने ही अशक्य गोष्ट सीताराम गावडे यांनी सद्गुरु कृपेने शक्य झाली . सीताराम ला साधी सुई जरी टोचली तर त्याची वेदना आपल्याला होते असे सांगून प्रकाशनला शुभेच्छा दिल्या.
यावेळी संपादक सीताराम गावडे यांनी प्रास्ताविक मध्ये गेल्या बावीस वर्षाची वाटचाल कथन केली.व सर्व मित्रांच्या पाठबळावर आपण हे सर्व शक्य करु शकलो असे स्पष्ट केले.यावेळी अभिमन्यू लोंढे, शिवप्रसाद देसाई, हरिश्चंद्र पवार, सुनील पेडणेकर,यांनी आपले मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.
पाहुण्यांचे स्वागत कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चे प्रतिनिधी व आमची एकजूट प्रतिनिधी यांनी केले.