आठ हजाराची लाच स्विकारताना देवगड तालुक्यातील कोटकामते येथील ग्रामसेवक ताब्यात..

आठ हजाराची लाच स्विकारताना देवगड तालुक्यातील कोटकामते येथील ग्रामसेवक ताब्यात..

देवगड /-

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकूलच्या तिसऱ्या हप्त्याचा प्रस्ताव पाठवण्याच्या कामासाठी तक्रारदारकडून ८ हजार रुपयांची लाच स्विकारताना देवगड तालुक्यातील कोटकामते ग्रामसेवक दीपक चिंतु केतकर (३७) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी ३ वा रंगेहात पकडले. यामुळे देवगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय अधिकारी दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक नितीश केणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री फाले, हवालदार श्री रेवंडकर, श्री परब, कांचन प्रभू, प्रथमेश पोतनीस, अजित खांडे यांनी सापळा रचून ही कारवाई केली.

अभिप्राय द्या..