शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचे आवाहन..

सिंधुदुर्गनगरी /-

वाढते कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता जिल्ह्यातील लाॅकडाऊनमध्ये १५ एप्रिलपर्यंत वाढ करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला आहे.याबाबत प्रसिद्धी पत्रकांच्या माध्यमातून त्यांनी माहिती दिली आहे. यात शासनाने निर्गमित केलेली सर्व आदेशाचे पालन करण्यात यावे, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दिलेल्या सुचना पुढील प्रमाणे

मा. मुख्‍य सचिव, महाराष्‍ट्र शासन, आपत्‍ती व्‍यवस्‍थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील No DMU/2020/CR 92/DisM-1 २९-०६-२०२० रोजीच्‍या आदेशामध्‍ये त्‍या त्‍या जिल्‍हयातील परिस्थिती प्रमाणे संबंधित जिल्‍हाधिकारी यांना जिल्‍हयातील रुग्‍ण स्थितीनुसार आदेश काढणेबाबत सर्वाधिकार देणेत आलेले आहेत.त्‍याअर्थी राज्‍य शासनाकडील निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्‍हयातील लॉकडाऊनची मुदत दिनांक १५-०४-२०२१ रात्री १२.०० वाजेपर्यंत वाढविण्‍यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्‍हयात लॉकडाऊनच्‍या मुदतीत कोविड-१९ संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखणेसाठी पुढील प्रामाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्‍यात येत आहे. मुखपट्टी / मास्‍कचा वापर – सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, कामाच्‍या ठिकाणी त्‍याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी व खाजगी वाहनातून प्रवास करताना मुखपट्टी / मास्‍क वापरणे बंधनकारक असेल. सामाजिक अंतर राखणे – नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना दोन व्‍यक्‍तींमध्‍ये किमान सहा फुटाचे अंतर राखणे बंधनकारक असेल. व्‍यापारी आस्‍थापनांमध्‍ये येणाऱ्या ग्राहकांमध्‍ये सामाजिक अंतर राखले जाईल याची दक्षता घेणे बंधनकारक असेल. अशा आस्‍थापनांमध्‍ये एकावेळी पाच पेक्षा जास्‍ती ग्राहक / व्‍यक्‍ती असणार नाहीत. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्‍यात प्रतिबंध – सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्‍यक्‍तींविरुद्ध त्‍या त्‍या संबंधित प्राधिकरणाने कायदे व नियम याद्वारे निश्चित केलेल्‍या दंडाची आकारणी करण्‍यात यावी. सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, गुटखा, तंबाखु, सुपारी इत्‍यादी खाण्‍यास, पिण्‍यास प्रतिबंध करण्‍यात येत आहे. घरातून काम करणे – खाजगी, शासकीय, निमशासकीय कार्यालये त्‍याचप्रमाणे व्‍यापारी, औद्योगीक आस्‍थापानामध्‍ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्‍यकतेप्रमाणे घरुन काम करण्‍याची मुभा देण्‍यात यावी. कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, बाजार तसेच औद्यागिक आस्‍थापनांच्‍या कामांच्‍या वेळामध्‍ये अशा ठिकाणी काम करणाऱ्या लोकांची गर्दी होणार नाही अशा पध्‍दतीने विभागणी करावी. सर्व आस्‍थापनांमध्‍ये येणारे कर्मचारी, ग्राहक यांचेसाठी शरीराचे तापमान तपासणे, हात धूणे आणि सॅनिटायझरची सुविधा सर्व प्रवेश, बर्हिगमन दारात व सामुदायिक जागांच्‍या ठिकाणी ठेवावी. सर्व आस्‍थापनांमधील कामांची जागा, सामुदायिक वापराची ठिकाणे त्‍याचप्रमाणे व्‍यक्‍तींचा एकमेकांशी संपर्क येईल अशी ठिकाणी वारंवार निर्जंतुकीकरण करण्‍यात यावीत. सर्व प्रकारच्‍या आस्‍थापनांमधील व्‍यवस्‍थापन, तिथे काम करणाऱ्या कामगारांमध्‍ये सामाजिक अंतर राखले जाईल, दोन कामांच्‍या पाळयांमध्‍ये अंतर असेल व कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्‍या वेळा भिन्‍न असतील याची दक्षता घ्‍यावी. प्रतिबंधात्‍मक उपाययोजना – कंटेन्‍टमेंट झोन – प्रतिबंधित क्षेत्रे स्‍थानिक प्रशासनाने घोषित केलेली प्रतिबंधित क्षेत्रे पुढील आदेशापर्यंत कायम राहतील. केंद्र शासन व राज्‍य शासनाने वेळोवेळी कंटेन्‍टमेंट झोन तयार करणेविषयी दिलेल्‍या सर्व सूचना या पुढील आदेशापर्यंत कायम राहतील. प्रतिबंधित क्षेत्रामध्‍ये सकारात्‍मक चाचणी आलेल्‍या सर्व व्‍यक्‍तींच्‍या संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तीची यादी तयार करणे, त्‍यांचा मागोवा घेणे, त्‍यांची ओळख पटविणे, त्‍यांचे अलगीकरण करणे आणि त्‍यांचा 14 दिवसांपर्यंत पाठपुरावा करणे. (सकारात्‍मक व्‍यक्‍तींच्‍या संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तींपैकी ८०% व्‍यक्‍तींना ७२% तासामध्‍ये शोधून काढणे) सिंधुदुर्ग जिल्‍हयात २८ मार्च २०२१ मध्‍यरात्रीपासून लागू असणाऱ्या प्रतिबंध आदेशाने सायंकाळी ८.०० वाजता ते सकाळी ७.०० वाजेपर्यंत ५ पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना एकत्र येण्‍यास मज्‍जाव असेल. याचे उल्‍लंघन करणाऱ्या व्‍यक्‍ती रक्‍कम रुपये १०००/- (प्रति व्‍यक्‍ती) दंडास पात्र राहतील. सिंधुदुर्ग जिल्‍हयात २८ मार्च २०२१ मध्‍यरात्रीपासून लागू असणाऱ्या प्रतिबंध आदेशाने सायंकाळी ८.०० वाजता ते सकाळी ७.०० वाजेपर्यंत सर्व सार्वजनिक ठिकाणे (बगीचे) बंद राहतील. याचे उल्‍लंघन करणारे व्‍यक्‍ती रक्‍कम रुपये १०००/- (प्रति व्‍यक्‍ती) दंडास पात्र राहतील. कोणतीही व्‍यक्‍ती मास्‍क परिधान न केलेली आढळल्‍यास रक्‍कम रुपये ५००/- दंडास पात्र राहील. सार्वजनिक ठिकाणी कोणतीही व्‍यक्‍ती थुंकताना आढळल्‍यास रक्‍कम रुपये १०००/- दंडास पात्र राहील. ₹सिंधुदुर्ग जिल्‍हयात सर्व सिनेमा हॉल (सिंगल स्क्रिन व मल्‍टीप्‍लेक्‍सेस) मॉल्‍स, सभागृहे आणि रेस्‍टॉरंट बंद राहतील. तथापी संबंधित कालावधी रेस्‍टॉरंट मधून होम डिलीवरी व पर्सल सुविधा देण्‍यास परवानगी असेल. ‘No Mask – No Entry’, ‘मास्‍क नाही प्रवेश नाही’ हा फलक सर्व खाजगी, शासकीय, निमशासकीय कार्यालये, उद्योग, दुकाने, बाजार इत्‍यादी ठिकाणी लावणे व त्‍याचे पालन करणे अशा आस्‍थापना, कार्यालयांचे प्रमुखांवर बंधनकारक असेल. ज्‍या आस्‍थापना, कार्यालये सदर अटीचे उल्‍लंघन करतील त्‍या आस्‍थापनांचे, कार्यालयांचे प्रमुख वैयक्‍तीकरित्‍या त्‍याचप्रमाणे अशा आस्‍थापना, कार्यालय संस्‍था म्‍हणून एकावेळी रक्‍कम रुपये १०००/- दंडास पात्र राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page