वेंगुर्ले पंचायत समिती येथे डेमो हाऊस बांधकामाचे भूमिपूजन..

वेंगुर्ले पंचायत समिती येथे डेमो हाऊस बांधकामाचे भूमिपूजन..

वेंगुर्ला / –

प्रधान मंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत डेमो हाऊस बांधकामाचे भुमिपूजन आज सकाळी पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक पातळीवर घरकुल डिझाइनच्या प्रोत्साहनार्थ एक प्रयत्न म्हणून करणेत आलेले आहे.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थींना घरकुल डिझाईन आकलनासाठी अशा प्रकारचे डेमो हाऊस तालुकास्तरावर बांधणेबाबत शासनाच्या सुचना आहेत. त्याच अनुषंगाने आज डेमो हाऊस बांधकामाचे भुमिपूजन सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपसभापती सिध्देश उर्फ भाई परब,गट विकास अधिकारी उमा पाटील,पंचायत समिती सदस्या साक्षी कुबल,पशुधन विकास अधिकारी डॉ.देसाई,कोरगांवकर,संतोष चव्हाण,सरमळकर,संजना करंगुटकर आदींसह पंचायत समिती अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..