वेंगुर्ले /-
वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील श्री देव जैतिर मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉकसाठी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांच्या प्रयत्नातून आमदार दिपक केसरकर यांनी ५ लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे. ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास क वर्ग यात्रा स्थळांचा विकास करणे अंतर्गत मंजूर असलेल्या जैतिर मंदिर परिसरात पेव्हींग ब्लाॅक बसविणे या कामाचे भुमिपुजन देवस्थानचे प्रथम मानकरी अनिल परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.पेव्हींग बसविणेकामी वेंगुर्ले शिवसेना तालुकाप्रमुख व पं. स.सदस्य यशवंत परब यांच्या प्रयत्नाने आमदार दिपक केसरकर यांनी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.या कामाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी तुळस ग्रा.प.सरपंच शंकर घारे,उपसरपंच सुशिल परब,मानकरी बाबा परब,ग्रा.पं.सदस्य जयवंत तुळसकर,शेखर तुळसकर,सोनू आरमारकर,देवस्थान समिती सचिव तथा वेंगुर्ले पत्रकार समितीचे सल्लागार आप्पा परब,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सचिव मकरंद परब,तंटामुक्ती समिती अध्यक्ष दिलीप परब,शिवसेना विभाग प्रमुख संजय परब,रामचंद्र शिरोडकर,दाजी
तुळसकर,राजन तुळसकर,संतोष कोरगावकर,विवेकानंद परब,राधाकृष्ण परब,तात्या तुळसकर,चिंतामणी तांबोसकर आदी उपस्थित होते.यापूर्वी भाविकांच्या सोईसाठी आमदार दिपक केसरकर यांनी भक्त निवास इमारतीसाठी १४ लाख रु.निधी मंजूर केला होता.