वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यात बुधवारी सकाळी कोव्हीड १९ (कोरोना) तपासणी रिपोर्टमध्ये ३ व्यक्तींचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये २ व्यक्ती व शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे करण्यात आलेल्या आरवली – सोनसुरे येथील १ व्यक्तीचा अहवाल कोव्हीड पॉझिटिव्ह आला आहे.यामध्ये रेडी येथील १ व्यक्ती मुंबई वरुन आलेला असून त्यास शिरोडा कोव्हिड सेंटर येथे व दुसऱ्या व्यक्तीस होम आयसोलेशन करण्यात आले आहे.तर आरवली – सोनसुरे येथील १ व्यक्तीस उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page