वेंगुर्ला / –
तालुक्यातील शिरोडा वेळागर समुद्रकिनारी ग्रामपंचायत सदस्य तथा सह्याद्री कासव व प्राणी मित्र आजू अमरे व सहकारी यांनी संरक्षित केलेल्या घरट्यातील दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवांच्या ८८ पिल्लांना आज नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
शिरोडा समुद्रकिनारी दरवर्षी विणीच्या हंगामात दुर्मीळ ऑलिव्ह रिडले कासवे अंडी घालतात. यावर्षी कासव मित्र आजू अमरे यांनी संरक्षित केलेल्या घरट्यातील अंड्यांपैकी ८८ ऑलिव्ह रिडले कासवाची दुर्मिळ पिल्ले बाहेर आली होती. त्यांना सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
आजू अमरे गेली अठरा वर्षे शिरोडा वेळागर समुद्रकिनाऱ्यावर या दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना या सामाजिक उपक्रमात कुटुंबिय व वेळागरवासिय सहकार्य करतात. काल घरट्यातून बाहेर आलेल्या ८८ पिल्लांना सुरक्षित रित्या समुद्रात सोडताना आनंद अमरे, सुरज अमरे , सुधीर भगत, संतोष भगत, समीर भगत, संजना भगत, स्वरा भगत, साहिल भगत, प्रकाश भगत, मदन अमरे, सुनैना भगत,समिरा भगत,गौरिज अमरे,दिपा अमरे, अमिषा अमरे तसेच सामाजिक वनीकरणचे अधिकारी स्वप्नील रोकडे, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य निलेश मयेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page