सावंतवाडी तालुक्यातील कंटेन्मेंट झोन जाहीर..

सावंतवाडी तालुक्यातील कंटेन्मेंट झोन जाहीर..

सावंतवाडी /-

सावंतवाडी तालुक्यात असे आहेत कंटेन्मेंट झोन – मौजे सावंतवाडी येथील बाहेरचावाडा येथील यशोधन इमारत येथे दिनांक २२ मार्च २०२१ रोजी पर्यंत, मौजे सावंतवाडी येथील सालईवाडा,सर्वोदयनदर वॉर्ड एफ, वृंदावन अपार्टमेंट येथे दिनांक १९ मार्च २०२१ रोजी पर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आला आहे.

सदर कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दिनांकापर्यंत सर्व अस्थपना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच नागरिकांच्या येण्या-जाण्यास व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. सदर आदेश अत्यावश्यक सेवा जसे सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था इ. वितरीत करणारे, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना लागू असणार नाहीत. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ व ५८ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ७१ ,१३९ आणि भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.

अभिप्राय द्या..