सिंधुदुर्गात १५ मार्च ते २९ मार्च पर्यंत मनाई आदेश जारी..

सिंधुदुर्गात १५ मार्च ते २९ मार्च पर्यंत मनाई आदेश जारी..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात होणारे आगामी सण जसे होळी, धुलीवंदन, शब-ए-बारात उत्सवा निमित्ताने आयोजित होणआरे कार्यक्रम, होऊ घातलेल्या निवडणूकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी यांच्याकडून पूर्व तयारी निमित्त होणोरे कार्यक्रम, तसेच जिल्ह्यात होणारी उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रास्ता रोको यासारखी आंदोलने सुरळीत पार पडून कोणताही अनुचीत प्रकार घरू नये. तसेच कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिलह्यातील यात्रा, उत्सव साध्या पद्धतीने जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या मर्यादेत साजरा करण्यात येणार आहेत.

परंतू इतर गावातून भाविक मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी करून त्या ठिकाणी त्यांना स्थानिकांकडून दर्शनास विरोध होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) (३) नुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार दिनांक १५ मार्च २०२१ ते २९ मार्च २०२१ रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागामध्ये मनाई आदेश जारी केले आहेत. या मानाई आदेशा नुसार पुढील कृत्ये करण्यास मनाई असणार आहे. कलम ३७(१) नुसार शस्त्र, सोटे तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किवा लाठ्या, किंवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बाळगणे, अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्यामुळे समाजाच्या भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.) सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे. कलम ३७(३) नुसार, जिल्ह्यामध्ये ५ अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणूका काढणे व सभा घेणे यास मनाई आहे. हा हुकून ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात वरील वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबंधीत विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तांना आणि लग्न इत्यादी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनीयम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

अभिप्राय द्या..