महिला काथ्या औद्योगिक सहकारी संस्था येथे उद्या महिला मेळावा..

महिला काथ्या औद्योगिक सहकारी संस्था येथे उद्या महिला मेळावा..

वेंगुर्ला /-

जागतिक महिला दिनानिमित्त उद्या सोमवार ८ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत वेंगुर्ले कॅम्प येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था येथे काथ्या उद्योग विस्तारीकरणासाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.आज पर्यंत अनेक महिलांना संस्थेमार्फत काथ्या प्रशिक्षण दिले आहे.यांनी पुढे येऊन स्वयंरोजगार स्थापन करावेत यासाठी लागणारे सर्व मार्गदर्शन यावेळी करण्यात येणार आहे. तसेच यशस्वी महिला उद्योजक यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.तरी कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करून महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे,असे आवाहन संस्थेचे मार्गदर्शक एम. के. गावडे व काथ्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..