वडाचापाट येथे गुणवंत विध्यार्थ्यांचा गौरव..

वडाचापाट येथे गुणवंत विध्यार्थ्यांचा गौरव..

मसुरे /-

वडाचापाट येथील पाटकरवाडी बंधु मंडळ यांच्या वतीने श्री देवी शांतादुर्गा सभा मंडप येथे वार्षिक जत्रोत्सवा निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे औचित्य साधुन मनसे उपविभाग सचिव अंकुर अशोक पाटकर आणि पाटकरवाडी बंधुमंडळ यांच्या सयुक्त विद्यमाने गावातील होतकरु विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी उपसरपंच जीजी पाटकर, मनसे पालीका कामगार सेना चिटणीस अंकुर पाटकर, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई,प्रमोद पाटकर, अनंत पाटकर, दीलीप प्रभुदेसाई, मधुसुधन पाटकर, सुभाष पाटकर, श्री मसुरेकर, शरद पाटकर, नाथा नालंग, आदि उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्याना शैक्षणिक साहीत्य वाटप करण्यात आले. तसेच तेजस्वनी माळकर, प्रणाली पालव, प्रीया पाटकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

अभिप्राय द्या..