मालवण /-

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती (रजि.) विलेपार्ले संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्ले संकुलाच्या स्ट्रेन्थ अण्ड फ़िट्नेस प्रशिक्षका मिस तनुजा लेले हिची भारतीय महिला क्रिकेट संघात फ़िट्नेस ट्रेनर म्हणून निवड झाली आहे. हा महिला क्रिकेट संघ ७ मार्च ते २४ मार्च २०२१ रोजी साऊथ आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. तनुजा लेले ही २०१९ पासून स्ट्रेन्थ आणि कंडिशनिंग कोच म्हणून प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात कामकाज पहात आहे. तनुजा लेले हीच्या निवडीमुळे क्रीडा क्षेत्रांत आनंदाचे वातावरण आहे. प्रबोनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू, सचिव डॉ. मोहन अ. राणे, कार्यकारी अधिकारी प्रितम केसकर व सह संपूर्ण प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या वतीने तिला शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाची निर्मिती मुंबईचे माजी महापौर माजी आमदार डॉ. रमेश यशवंत प्रभू यांनी केली आहे. तनुजाच्या अनुभवाचा क्रीड़ा संकुलातील खेळाडूंना खूप फ़ायदा झाला आहे. सुमारे ७ ये ८ महिने चाललेल्या लॉकडाऊन मध्ये ही तनुजाने ऑनलाइन फ़िट्नेस सेशन घेतल्याने जिम्नॅस्टिक्स खेलाडूंना त्याचा फ़ारच फ़ायदा झाला आहे. असे जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक हरीश परब आवर्जुन सांगतात. तनुजा लेले यांच्या निवडी बद्दल अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page