निरुखे पांग्रड येथे साडेपाच लाखांचा दरोडा प्रकरणी फरार असलेल्या राजबहाद्दर गुडु यादव याला कुडाळ पोलिसांनी केली अटक..

निरुखे पांग्रड येथे साडेपाच लाखांचा दरोडा प्रकरणी फरार असलेल्या राजबहाद्दर गुडु यादव याला कुडाळ पोलिसांनी केली अटक..

कुडाळ /-

निरुखे पांग्रड येथे साडे पाच लाखांचा घातलेला दरोडा प्रकरणी फरार असलेल्या राजबहाद्दर गुडु यादव (वय-45, रा. पुणे ) याला कुडाळ पोलिसांनी अटक केली असुन न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे अशी माहिती कुडाळ पोलिस ठाण्यातुन देण्यात आली.

दि. 22 एप्रिल 2018 रोजी निरूखे पांग्रड येथील रामदास करंदीकर यांच्या घराची सीआयडी अधिकारी असल्याचा बनाव करून झडती घेत साडेपाच लाख रुपयांची लूट करून दरोडा घालणारा मुख्य सुत्रधार श्रीजीत रमेशन (देहू रोड,पुणे) याला नवी मुंबईतून तर दुसरा संशयित इरफान निजामुद्दीन शेख(रा.पुणे) या दोघांना दिड वर्षापुर्वी पुण्यातून अटक करण्यात आली होती. या प्रकरणी अजुनही काही संशयित फरार होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते. दरम्यान यातील फरार राजबहाद्दर यादव हा कुडाळ न्यायालयात स्वताहुन हजर झाला होता. या दरम्यान त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले व अटक केली. यादवला न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असुन या प्रकरणातील अजुनही काही आरोपी फरार आहेत त्यांचा ही शोध सुरू असल्याची अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

अभिप्राय द्या..