मध्यप्रदेशयेथुन पर्यटनासाठी सिंधुदुर्गात आलेल्या पर्यटकांची कुडाळ पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद..

मध्यप्रदेशयेथुन पर्यटनासाठी सिंधुदुर्गात आलेल्या पर्यटकांची कुडाळ पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद..

कुडाळ /-

मध्यप्रदेश येथुन पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या मध्यप्रदेश येथील अंकुर सोनी या 35 वर्षीय युवकाचा उपचारा दरम्यान आकस्मिक मृत्यू झाला. या बाबत कुडाळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात मयत अंकुर याचा चुलत भाऊ राहुल सोनी यांनी खबर दिली की, ते व मध्यप्रदेश येथुन दि. 30 जानेवारी रोजी गोवा येथे पर्यटनासाठी आले होते. गोवा येथे पर्यटन केल्यानंतर तेथे भाड्याच्या कार गाडीने दि. 1 फेब्रुवारी रोजी मालवण येथे स्कुबा ड्रायव्हिंग करण्यासाठी जात होते.
या प्रवासा दरम्यान कुडाळ शहराच्या जवळ आले असता ते एका हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी थांबले. यावेळी अंकुर याच्या डोक्यात दुखू लागले. त्यामुळे त्याला तात्काळ तेथील एका खासगी डॉक्टरांकडे तपासणी केली. त्या डाॅक्टरनी अंकुरला अधिक उपचारासाठी कुडाळ येथील येथील रूग्णालयात नेण्यास सांगितले. त्यामुळे सर्वांनी त्याला तात्काळ कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

अभिप्राय द्या..