कुडाळ/-
कुडाळ तालुक्यातील नेरूरपार येथे कर्ली नदीच्या काठी अनधिकृत वाळू उपसा करण्याच्या तयारीत असलेल्या सहा परप्रातीयांना कुडाळ पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले,असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांनी दिली.
ही कारवाई सायंकाळी उशिरा करण्यात आली. हे सर्व बिहार राज्यातील कामगार आहेत. यामध्ये गुडूबिज सहारगेबी जाबीन (३०) मन्नू धर्मराज परस्वान (२६) कमलेश कथवालू चव्हाण (३२)
भोला गंगा चव्हाण (४५)
महयुबीन सिरपत बीन (३५) नीरज बबनसिंग पटेल (२६) सर्व रा बिहार या सहा जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कुडाळ पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे यांनी दिली.
नेरूरपार भागात अनधिकृत वाळू उपसा करण्याच्या तयारीत काही परप्रांतीय असल्याची माहिती कुडाळ पोलिसांना मिळाली होती. यानुसार कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, पोलिस मंगेश शिंगाडे व चालक रामदास गोसावी हे नेरूरपार येथे गेले व वाळू उपसा करण्याच्या तयारीत असलेल्या सहा परप्रांतीयांना ताब्यात घेतले. हे सहाही जण विनापरवाना वाळू उपसा करण्याच्या तयारीत असल्याचे पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे यांनी सांगितले. या सहाजणांना बुधवारी कुडाळ तहसीलदार यांच्या समोर हजर करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.