कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली यांच्यावतीने दिला जाणारा ‘सामाजिक कार्य पुरस्कार 2020’ एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट, पंचक्रोशी पाट या संस्थेचे कार्यवाह मा. श्री. दिगंबर अच्युत सामंत (सर)यांना जाहीर करण्यात आला.

मा.श्री.दिगंबर अच्युत सामंत (सर) एस.एल. देसाई विद्यालय, पाट या प्रशालेत 1971- 72 मध्ये सेवेत रुजू झाले .2005 साली श्री.सामंत सर यांनी उपमुख्याध्यापक पदाची धुरा अत्यंत यशस्वीरीत्या सांभाळली. 2006 मध्ये ते सेवानिवृत्त झाले . एकूण 35 वर्षे त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आपल़ी सेवा बजावली .सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एस. एल. देसाई विद्यालय पाट या प्रशालेने नावलौकिक मिळवला आहे .त्यामध्ये संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची प्रचंड मेहनत,दुर्दम्य इच्छाशक्ती, शाळेवर नितांत श्रद्धा, कामावरील निष्ठा, विद्यार्थ्याप्रती असणारे प्रेम या सर्वांचा परिपाक आहे आणि यामध्ये आपल्या सामंत सरांचा सिंहाचा वाटा आहे. एवढ्या मोठ्या शाळेचा डोलारा सांभाळताना सामंत सरांनी सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. सेवानिवृत्तीनंतर शैक्षणिक व सामाजिक सेवा निस्वार्थपणे व निरपेक्षतेने करावी या उदात्त हेतूने सामंत सर एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळामध्ये 2010 पासून संस्था कार्यवाह म्हणून अव्याहतपणे काम करत आहेत.त्यांच्या या उत्तुंग कार्याची दखल घेऊन कुडाळदेशकर गौड ब्राह्मण डोंबिवली या संस्थेने त्यांना 2020 चा ‘सामाजिक कार्य पुरस्कार’ जाहीर केला.

या कार्यक्रमाला सहयोग संस्थेचे सदस्य मा. श्री‌. संजय ठाकूर. संस्था कार्याध्यक्ष मा. श्री. रेडकर गुरुजी , संस्था पदाधिकारी मा.श्री.दशरथ नार्वेकर,मा. श्री. देवदत्त साळगावकर , मा.श्री .विजय कुडव.,पर्यवेक्षक मा. श्री. हंजनकर सर . तरुण कीर्तनकार, माजी विद्यार्थी सदाशिव पाटील ,मिलिंद पाटील ,श्री.प्रथमेश नाईक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ.पडते जे.जी. यांनी केले तर मान्यवरांचे आभार प्रशालेचे उपमुख्याध्यापक मा.श्री.ठाकूर सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page