राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव यांना पत्नी शोक..

राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव यांना पत्नी शोक..

कणकवली /-

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव यांच्या पत्नी सुषमा रुपेश जाधव (वय 35) यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात निधन झाले.रुपेश जाधव यांच्या पत्नी सुषमा रुपेश जाधव यांच्यावर वालावलकर रुग्णालय डेरवण येथे उपचार सुरू होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने वालावलकर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना वाचविण्याचा शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्याचा काही उपयोग होऊ शकला नाही. अखेर आज सकाळी त्यांनी अखेरचा स्वास घेतला.

त्यांच्या मागे पती रुपेश जाधव, दीड वर्षाची मुलगी, सासू-सासरे, दीर असा परिवार आहे. आज दुपारनंतर त्यांचे पार्थिव कलमठ गुरववाडी शिक्षक कॉलनी येथील त्यांच्या घरी आणण्यात येणार आहे.

अभिप्राय द्या..