किर्लोस येथे तलाठी कार्यालय,रेशन धान्य दुकान,पोस्ट कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्र या कार्यालयांचे उद्घाटन..

मसुरे /-

किर्लोस हा छोटासा गाव आहे. तरी देखील सरपंच बंडू सावंत व सदस्य यांच्या पाठपुराव्यामुळे याठिकाणी तलाठी कार्यालय, रेशन धान्य दुकान, पोस्ट कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्र हि महत्वाची कार्यालये गावात सुरु करण्यात आली आहेत. येथील लोकांना रेशन धान्यासाठी दूरवर जावे लागत होते. ती समस्या आता मार्गी लागली आहे. तलाठी कार्यालयामुळे लोकांची सातबारा,व इतर जमिन विषयक कामे करणे सुलभ झाले आहे. पोस्ट कार्यालयाचा वापर पत्र व मनिऑर्डर पुरता न राहता बँकिंग व्यवस्था झाली आहे. त्यामुळे लोकांनी पैसे गुंतविण्यासाठी पोस्ट कार्यालयाचा वापर करावा. आपले सरकार सेवा केंद्रामुळे ऑनलाईन सर्व कामे करणे सोपे झाले आहे. हि सर्व कार्यालये एकाच ठिकाणी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरु झाल्याने ग्रामस्थांचा वेळ वाचून लाभदायक ठरणार आहेत. येत्या काळात गावातील प्रलंबित विकास कामे करण्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल असे आश्वासन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी दिले.
किर्लोस गावठाण येथे तलाठी कार्यालय, रेशन धान्य दुकान, पोस्ट कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्र हि महत्वाची कार्यालये एकाच ठिकाणी सुरु करण्यात आली असून या कार्यालयांचे उदघाटन आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, तहसीलदार अजय पाटणे, सरपंच बंडू सावंत यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
याप्रसंगी संदेश पारकर म्हणाले, घोषणा केली म्हणजे काम होत नाही. त्यासाठी पाठपुरावा करणे महत्वाचे असते. आमदार वैभव नाईक हे मतदारसंघात लोकांच्या दररोज संपर्कात असतात. लोकांच्या समस्या जाणून घेत असतात.हे करत असताना लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी, केलेली घोषणा पूर्णत्वास नेण्यासाठी मंत्रालयात ते पाठपुरावा करत असतात. असे आमदार येथील लोकांना लाभले हे आपले भाग्य आहे. त्यांच्या माध्यमातून येथील विकासाला गती मिळाली असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले.
यावेळी नंदू गावडे, आनंद सावंत, हेमंत पारकर, विलास घाडीगावकर, बंडू चव्हाण, बाबा सावंत, सुभाष धुरी, विकास लाड, पंढरी घाडीगावकर, प्रवीण घाडीगावकर, स्वानंद भावे, अरुण भावे, दीपक किर्लोस्कर, मंगेश घाडीगावकर, आनंद मालवणकर, दशरथ घाडीगावकर, सर्कल राजेंद्र शिंगाडे, तलाठी श्री. बजबलकर, पोस्टमास्टर- दीपाली पाटील, रेशन दुकान चालक- प्रियांका सावंत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page