वेंगुर्ला /-
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा या मोहिमेअंतर्गत वेंगुर्ले न.प.मार्फत आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना नगरपरिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गौरविण्यात आले.
वेंगुर्ला न.प.मार्फत स्वच्छतेच्या प्रचार – प्रसार करण्यासाठी घेण्यात आलेल्या विविध ऑनलाइन स्पर्धेतील विजेत्यांना वेंगुर्ला नगरपरिषद
तर्फे आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गौरविण्यात आले.यामध्ये चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा(मोठा गट व लहान गट) यातील प्रथम ३ क्रमांकप्राप्त व उत्तेजनार्थ यांना रोख पारितोषिक व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार आबा खवणेकर,जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कारप्राप्त पत्रकार
दिपेश परब व चतुर्थश्रेणी कर्मचारी कवि करलकर यांना शाल,श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.तसेच स्पर्धेचे परीक्षक संजय पुनाळेकर, सुनिल नांदोसकर,कैवल्य पवार,प्रा.वसंतराव पाटोळे यांचा सन्मान करण्यात आला.तसेच वेंगुर्ला न.प.ला मिळालेल्या बक्षिस रकमेतून सर्व शाळा,शासकीय कार्यालये,शासकीय कार्यालये व तालुक्यातील पत्रकार यांना स्वच्छतेचा संदेश देणारी घड्याळे वितरित करण्यात आली.या कार्यक्रमास नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप,मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे,गटनेते सुहास गवंडळकर,प्रकाश डिचोलकर,नगरसेवक प्रशांत आपटे,विधाता सावंत,स्नेहल खोबरेकर,पूनम जाधव,धर्मराज कांबळी,साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर,दादा सोकटे तसेच प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल,न.प.अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.