कुडाळ /-
आकेरी-आंजीवडे घाटरस्ता प्रश्न लवकरच मार्गि लागण्याची आता चिन्हे..
आकेरी-आंजीवडे घाटरस्ता प्रश्न लवकरच मार्गि लागण्याची आता चिन्हे दिसत आहेत. गेले काही वर्ष सलत असलेल्या या प्रश्नाची तड लावण्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी सभाही आयोजित करण्यात आली होती. त्याचाच परिपाक म्हणून आंजीवडे घाट कृती समितीच्या वतीने आज खासदार विनायक राउत आणि पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देण्यात आले.
पालकमंत्री उदय सामंत यांनी वन खात्याच्या अखत्यारीत असलेला ३ कि.मी. अंतर रस्ता आणि त्यासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यासंदर्भात आपण बांधकाम मंत्र्यांची बैठक घेऊन हा प्रश्न तडीस नेऊ असे अभिवचन दिले. तसेच माणगाव खोऱ्यात खासदार पालकमंत्री आणि आमदार वैभव नाईक तसेच संबंधित अधिकारी यांच्यासमवेत १८ फेब्रुवारी नंतर बैठक बोलावून या घाटरस्त्याचे माणगाव खोरेवासीयांचे स्वप्न साकार करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.