नगरपंचायत सफाई कर्मचारी आशा सेवीका यांना लस देण्याबाबत नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी वेधले जिल्हाधिकारी यांचे लक्ष !

नगरपंचायत सफाई कर्मचारी आशा सेवीका यांना लस देण्याबाबत नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी वेधले जिल्हाधिकारी यांचे लक्ष !

कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने जिल्हा ओरोग्य कर्मचारी प्रशासना बरोबरच नगरपंचायत सफाई कर्मचारी, आशा सेवीका यांना लस देणेबाबत कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन देत लक्ष वेधले आहे.कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी कोरोना विरुध्दची लढाई गेले वर्षभर सर्व नागरीक लढत आहेत आता कोरोना वरील लस आली ही आनंदाची गोष्ट आहे. कोरोनाच्या या लढाईमध्ये जिल्हातील सर्व प्रशासन,अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांनी ‘कोरोना योध्दा’ म्हणून चांगले काम केलेलेच आहे.हि लस त्यांना प्रथम देणे योग्यच आहे.पण या लढाईत त्यांच्या खांद्याला-खांदा लावून काम करणारे जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत, ग्रामपंचायत यांचे सफाई कर्मचारी, आशा सेवीका, नगरपंचायत कंत्राटी कर्मचारी त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन यांनाही लस देण्यात यावी.कारण त्यांनीही आपला जिव धोक्यात घालून गावपातळीवर ‘कोरोना योध्दा’ म्हणून मोठे काम केलेले आहे. याची दखल घ्यावी असे आवाहन कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..