वैभववाडीत भाजपाच्यावतीने घंटानाद आंदोलन.

वैभववाडीत भाजपाच्यावतीने घंटानाद आंदोलन.

लाँकडाऊनमुळे बंद असलेली मंदिरे सुरू करण्यासाठी वैभववाडीत भाजपाच्यावतीने घंटानाद आंदोलन..

लाँकडाऊनमुळे बंद असलेली मंदिरे व इतर धार्मिक स्थळे तात्काळ खुली करा. या मागणीसाठी वैभववाडी भाजपच्यावतीने गावागावात घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपा कार्यकर्त्यांनी दार उघड उद्धवा दार उघड, अशी हाक दिली.तालुक्यातील कुसुर, तिथवली, उंबर्डे, कोकिसरे तसेच इतर गावात कार्यकर्त्यांनी शनिवारी घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनात वैभववाडी भाजपा अध्यक्ष, सभापती, नगराध्यक्ष, कार्यकारणी सदस्य, पं. स. व जि. प. सदस्य, नगरसेवक, सरपंच, शक्तीप्रमुख बुथप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अभिप्राय द्या..