वेंगुर्ला /-स्वामी विवेकानंद जयंती – राष्ट्रीय युवक दिनाच्या औचित्याने नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग,तुळस यांच्या संयुक्त विद्यामाने १२ ते १९ जानेवारी या कालावधीमध्ये ‘युवा सप्ताहा’ चे आयोजन करण्यात आले आहे.सदर युवा सप्ताह अंतर्गत १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि युवकांना मार्गदर्शनपर व्याख्यान ,१३ जानेवारी ‘सांस्कृतिक दिनाचे’ औचित्याने युवकांसाठी पथनाट्यातून सामजिक प्रबोधन, दि १४ जानेवारी ‘प्रतिभागीता दिवस’ अंतर्गत ‘व्यसनाचे दुष्परिणाम’ या विषयावर खुल्या गटामध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन हॉटेल लौकिक सभागृह, वेंगुर्ला येथे सकाळी १० वा. करण्यात आले आहे. सदर स्पर्धेतील विजेत्या प्रथम तीन क्रमांकासाठी अनुक्रमे ७००रु.,५००रु.,३०० रु. प्रत्येकी मेडल,प्रमाणपत्र आणि उत्तजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी मेडल व प्रमाणपत्र व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच याच दिवशी सामाजिक समस्येवर भाष्य करण्यासाठी ‘तरुणाईत वाढते आत्महत्येचे प्रमाण:एक गंभीर समस्या’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निबंध स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रु १०००,रु ७००, रु ५००, उत्तेजनार्थ रु २५० ,प्रत्येकी चषक आणि प्रमाणपत्र व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
१५ जानेवारी ‘सामाजिक सेवा’ दिवसातर्गत युवकांच्या सहभागातून सार्वजनिक स्वछता अभियान व श्रमदानातून वनराई बंधारा बनवला जाणार आहे. १६ जानेवारी रोजी *’शारीरिक फिटनेस दिवस’* निमित्त तुळस वेताळ मंदिर येथे सकाळी ७.०० वा. *खुल्या गटासाठी मॅरेथॉन स्पर्धा* आयोजित करण्यात आली असून विजेत्यांना अनुक्रमे खुला गट पुरुष रु.१५००,रु.१०००,रु ७००,खुला गट महिला विजेत्यांना अनुक्रमे रु.५५५,रु. ४४४,रु.३३३, इयत्ता ८वी ते १०वी मुली व मुलगे विजेत्यांना अनुक्रमे रु.३३३,रु.२२२,रु.१११ प्रत्येकी मेडल व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. याच दिवशी सकाळी ९.०० वा. खुल्या *स्लो सायकलिंग स्पर्धा* तुळस येथे आयोजित केली असून प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी रु३२१,रु२२१,रु १२१ प्रत्येकी मेडल व प्रमाणपत्र व सर्व सहभागीना प्रमाणपत्र दिले जाईल. १७ जानेवारी *’शांती दिवसा’* च्या औचित्याने *वक्तृत्व स्पर्धेचं* आयोजन करण्यात आले असून विजेत्या प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे रु.१०००, रु.७००,रु.५००, उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमाकांना प्रत्येकी २५०,प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. १८ जानेवारी ‘कौशल्य विकास दिवस’ निमित्त युवकांसाठी स्वयंरोजगार व कौशल्य विकासासाठी विविध योजना व रोजगाराच्या संधी विषयी मार्गदर्शन व दि.१९ जानेवारी ‘जागरूकता दिवस’ निमित्ताने- मनरेगा, माहितीचा अधिकार व सरकारच्या विविध योजना विषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन अशा स्वरूपाचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर युवासप्ताह अंतर्गत येणाऱ्या विविध स्पर्धा व उपक्रमांविषयी अधिक माहिती करता गुरुदास तिरोडकर(९४२०७४७२६८) यांच्याशी संपर्क साधावा. युवासप्ताह अंतर्गत सर्व स्पर्धांचा व उपक्रमांचा युवकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन नेहरू युवा केंद्र सिधुदुर्ग चे जिल्हा समन्वयक मोहीतकुमार सैनी व वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्गचे अध्यक्ष प्रा. सचिन परुळकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page