माडखोल – सावंतवाडी येथील समृद्धी दुग्धव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन उद्या..

माडखोल – सावंतवाडी येथील समृद्धी दुग्धव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन उद्या..

वेंगुर्ला /-

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग, भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप व देसाई डेअरी माडखोल यांच्या संयुक्त विद्यमाने माडखोल – सावंतवाडी येथील समृद्धी दुग्धव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन शनिवार ९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वा.माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.हा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.या कार्यक्रमास सहा.निबंधक संस्था(दुग्ध) ओरोस – कृष्णकांत धुळप,जिल्हा प्रबंधक नाबार्ड – अजय थुटे,सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष एम.के.गावडे,जि.प.सदस्या पल्लवी राऊळ,
उद्योजक प्रशांत कामत,पं. स.सदस्या सुनंदा राऊळ, माडखोल सरपंच संजय शिरसाट,माडखोल विकास संस्था अध्यक्ष दत्ताराम कोळमेकर आदींसह सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष एम.के.गावडे,भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.प्रसाद देवधर,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई,प्रोप्रा.प्रभाकर देसाई आदी मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन उपाध्यक्ष सुरेश दळवी,संचालक विकास सावंत,गुरुनाथ पेडणेकर, प्रमोद कामत व संचालक मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..