कुडाळ /-
मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी साईमंदीर येथे कार व मोटरसायकल यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . मात्र डोक्यातील हॅल्मेटमुळे सुदैवाने तो बालंबाल बचावला. हा अपघात शनिवारी सकाळी ११.४० वाजताच्या सुमारास झाला.
गोवा येथून कारचालक पिंगुळी साईमंदिर येथे आला व त्याला परत वळून पुन्हा गोवा येथे जात होता तर मोटरसायकलस्वार गोव्याहून रत्नागिरीच्या दिशेने जात होता. कारचालकाने वळण्यासाठी आपल्या ताब्यातील कार अचानक वळवल्याने मोटरसायकलची कारला जोरदार धडक बसली. यात मोटरसायकलस्वार मोटरसायकलसह रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्यावर हँल्मेट असल्याने सुदैवाने तो बचावला.
त्याला किरकोळ दुखापत झाली. या अपघाताची माहिती कुडाळ पोलिस ठाण्याला मिळताच पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्यासह पोलिस दयानंद चव्हाण, श्री पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोहेकॉ दयानंद चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताची माहिती घेतली. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातानंतर सुमारे एक तासानंतर कारचालकाने सवय मोटर सायकल स्वारला मोटरसायकलच्या दुरूस्तीसह सर्व खर्च देण्याचे मान्य केले. तडजोडीने हा विषय मिटवण्याचे प्रयत्न सुरू होते.