कोल्हापूर /-

कोल्हापूरातील गोखले महाविद्यालयात IQAC सेल आणि रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध हिलर, ॲक्यूप्रेशर तज्ञ विद्यालक्ष्मी राजहंस,स्मित क्लिनिक, डायरेक्टर, कोल्हापूर यांचे मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
२०२१ साल हे आरोग्य सावधान वर्ष म्हणून साजरे केले जात असतानाच, या वर्षात उद्भवणारे व्याधी, ग्लोबल वॉर्मिग इफेक्ट यासाठी प्रत्येक वयातील व्यक्तीने ॲक्कू प्रेशर समजावून घेऊन आजमावले पाहिजे आणि आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. कोणत्याही साईड इफेक्ट्स शिवाय प्राथमिक तत्वावर प्रत्येकाने या पद्धतीचा अवलंब आपल्या दैनंदिन जीवनात स्वीकारला पाहिजे. भारतीयांचा संस्कार पाया असलेला योग, naturopathy, आहार,याबरोबरच अक्कू प्रेशर चे महत्व ही अनन्य साधारण आहे. याचे पुनरुज्जीवन होऊन नवीन पिढी सुदृढ व हुशार व्हावी या उद्देशाने या थेरपीचा अवलंब खेळातून, शिक्षणातून, घरातूनच जीवनात व्हावा अशी ईच्छा राजहंस मॅडमनी या वेळी दर्शवली. शिक्षण
प्रसारक मंडळाचे आदरणीय सेक्रेटरी प्राध्यापक श्री जयकुमार देसाई, पेट्रान कौन्सिल मेंबर मा. श्री. दौलत कुमार देसाई, ॲडमिनीस्ट्रेटीव ऑफिसर मा. डॉ.मंजिरी मोरे, प्राचार्य डॉ.पी.के.पाटील, उपप्राचार्य श्री. पिसाळ सर, श्री. मोरे सर यांनी मार्गदर्शन केले.
तसेच नॅक कोर्डीनेटर डॉ. डी. वी. आवळे, प्रो. श्री. पी. बी. झावरे सर, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रो.श्री. पी.पी. सुतार, प्रोग्रॅम को ऑर्डीनेटर डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी, NCC प्रमुख प्रा. श्री. डी.के. नरले, वाचनालय प्रमुख श्री कीलकीले सर यांचे कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. यावेळी
वाचनालय कर्मचारी यांनी सहकार्य केले.
या कार्यशाळचा लाभ सर्व प्राध्यापक, उपस्थित विद्यार्थीवर्ग, ऑफिस सहकारी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page