मालवण /
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलचे माजी कलाशिक्षक आणि मालवण कोतेवाडा येथील रहिवासी पुंडलिक महादेव केळुसकर (वय ८०) यांचे आज शनिवारी रात्रौ पावणे सात वाजण्याच्या सुमारास मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने निधन झाले.
केळुसकर हे चित्रकलेत तरबेज होते. विद्यार्थीप्रिय शिक्षक असणाऱ्या केळुसकर यांनी अनेक विद्यार्थ्यां मधील कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहित केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकलेचे धडे गिरवणारे अनेक विद्यार्थी आज कलेच्या प्रांतात उच्च स्तरावर कार्यरत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.