मालवण तालुका पत्रकार समितीचा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा ५ जानेवारी रोजी

मालवण तालुका पत्रकार समितीचा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा ५ जानेवारी रोजी

मालवण /

मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार दिन आणि तालुकास्तरीय पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा दि. ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दैवज्ञ भवन, मालवण येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्री. गजानन नाईक, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. गणेश जेठे तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार वैभव नाईक तसेच मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सभापती अजिंक्य पाताडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यात मालवण तालुका पत्रकार समिती तर्फे जाहीर झालेल्या पत्रकार पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यात पत्रकार विनोद दळवी यांना कै. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, पत्रकार अमोल गोसावी यांना स्व. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार, तर पत्रकार झुंजार पेडणेकर यांना बेस्ट स्टोरी अवार्ड प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. तसेच मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, पी. के. चौकेकर, डी. टी. मेथर, सौगंधराज बादेकर, विवेक नेवाळकर या पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात दहावी, बारावी तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या पत्रकारांच्या पाल्याचा सत्कार करण्यात येणार आहे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा सोशल डिस्टन्स पाळून, मास्क लावून व शासनाचे नियम पाळून संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन मालवण पत्रकार समितीचे अध्यक्ष श्री. प्रफुल्ल देसाई व सचिव श्री. प्रशांत हिंदळेकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..