राधिका नारायण घाटये हिचा तळवणे ग्रामपंचायत तर्फे सत्कार..

राधिका नारायण घाटये हिचा तळवणे ग्रामपंचायत तर्फे सत्कार..

वेंगुर्ला /-

नाशिक येथे झालेल्या जिल्हा स्तरीय महिला क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग संघाने तृतीय क्रमांक मिळविला. कु.राधिका घाटये हिने या संघाचे कर्णधारपद भूषविले. सिंधुदुर्गच्या या महिला संघाने मिळविलेल्या यशामुळे सर्वत्र या टीमचे कौतुक होत आहे.कप्तानपद भूषविलेली कु.राधिका घाटये हि तळवणे गावची असून तिच्या यशामुळे गावातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.ग्रामपंचायत तळवणे तर्फे तिचा नुकताच शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी माजी पं.स. उपसभापती संदीप नेमळेकर,सरपंच वैभवी रेडकर, उप सरपंच – समीर केरकर, ग्रा.प सदस्य दत्ताराम बर्डे, प्रणिता पेडणेकर , प्रतिक्षा गावडे,संजय गावडे,विनय पालव, संतोष गावडे,तलाठी भिंगारे, ग्रामसेवक , पप्या घाटये, अशोक घाटये,प्रविण बर्वे आदी उपस्थित होते.यावेळी तिला व तिच्या पूर्ण टीमला भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

अभिप्राय द्या..