सागरतीर्थ ग्रा.पं.मध्ये समृद्धी कुडव यांची सदस्यपदी बिनविरोध निवड..

सागरतीर्थ ग्रा.पं.मध्ये समृद्धी कुडव यांची सदस्यपदी बिनविरोध निवड..

वेंगुर्ला /-

तालुक्यातील सागरतीर्थ ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ मधून समृद्धी कुडव यांची ग्रा. प. सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे वेंगुर्ले शिवसेनेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच या एका जागेने शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणूकित तालुक्यात आपले खाते खोलले आहे.त्यामुळे शिवसैनिकांनी जल्लोष केला.
वेंगुर्ले तालुक्यातील २ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यामध्ये सागरतीर्थ ग्रा. प प्रभाग क्रमांक ३ मधील सर्वसाधारण गटातून महिला समृद्धी संतोष कुडव यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल त्यांचे शिवसेना शाखेत स्वागत करून अभिनंदन करण्यात आले. कुडव या शिवसेनेच्या महिला शाखा संघटिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन करताना शिवसेना तालुका प्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ, उपतालुकाप्रमुख सुधाकर राणे, विभागप्रमुख काशीनाथ नार्वेकर, बाळा कुडव, सुवर्णा राणे, कृष्णा सावंत, शेखर कुडव, नेहा तांडेल, नरेंद्र मोंडकर, प्रसाद आरेकर, श्रीकांत घाटे, संतोष कुडव, बाळा पेडणेकर, भाग्यश्री कांबळी, अवधूत चीचकर, गिरीश राणे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..