तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनीही गाव विकास प्रक्रियेत लोकांना सामावून घेऊन गावचा विकास करावा .;सभापती अनुश्री कांबळी

तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनीही गाव विकास प्रक्रियेत लोकांना सामावून घेऊन गावचा विकास करावा .;सभापती अनुश्री कांबळी

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला येथे झालेल्या सरपंच – ग्रामसेवक कार्यशाळेत स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त मठ ग्रामपंचायतीचे सरपंच तळशीदास ठाकूर, ग्रामसेवक विकास केळूसकर, तत्कालीन ग्रामसेवक विवेक वजराटकर,तालुक्यातील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त वेतोरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भूषण चव्हाण, वेतोरे सरपंच राधिका गावडे यांचा पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपिठावर गटविकास अधिकारी उमा पाटील, आरोग्य विस्तार अधिकारी एस.बी.गोसावी, एस.टी.परब, प्रशिक्षक दादा साईल, संतोष पाटील, कृषि विस्तार अधिकारी भास्कर केरवडेकर आदी उपस्थित होते. तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनीही गाव विकास प्रक्रियेत लोकांना सामावून घेऊन गावाचा विकास करावा, असे प्रतिपादन अनुश्री कांबळी यांनी केले.

अभिप्राय द्या..