विजय बागवे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

विजय बागवे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

मसुरे

मसुरे विकासवाडी गावचे सुपुञ श्री. विजय तायाजी बागवे हे मध्य रेल्वे विद्युत विभाग, माटुंगा- मुंबई येथे ” सिनियर सेक्शन इंजिनियर” ह्या महत्वाच्या पदावरून ३९ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. मसुरे येथे शालेय शिक्षण पुर्ण केल्यावर ते १९८० मध्ये रेल्वे सेवेत रुजू झाले.२०१५ मध्ये विजय बागवे ह्यानी दिलेल्या प्रामाणिक सेवेबद्दल त्यांना मध्य रेल्वेचा मानाचा ” जनरल मॅनेजर अवार्ड- २०१५” ने सन्मानीत करण्यात आले.२०१७ मध्ये त्यांची “ज्युनियर इंजिनियर” पदी नियुक्ती झाली व त्यानंतर त्यांना ” सिनियर सेक्शन इंजिनियरपदी ” नियुक्ती देण्यात आली होती.
सेवानिवृत्ती पर सत्काराला उत्तर देताना बागवे म्हणाले, सर्व सहकार्‍यांचे सहकार्य मिळाले त्यामुळे यशस्वी पणे कार्यकाल पूर्ण करू शकलो. आपल्या यशाचे श्रेय आपले जेष्ठ मिञ व सेवानिवृत्त प्रशिक्षक विद्युत विभाग अशोक दाभोलकर, डेबराॅयसाहेब, जगदीश शेलार, अरविंद जोशीसाहेब, जैनसाहेब, हेमंत देसाई याना असल्याचे सांगीतले.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उद्योजक श्रीकृष्ण परब, उद्योजक दिपक सावंत, रवि बांदीवडेकर, जगदीश शेलार, सुमित पाटेकर, चेतन गुडांळ, एस. एन. बुखारी ह्यानी शुभेच्छा दिल्या.

अभिप्राय द्या..