मसुरे

जि.प.पूर्ण प्राथ.शाळा तिवरे खालचीवाडी येथे प्रितगंध फाऊंडेशन मुंबई च्या माध्यमातून सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना देणगीदारांचा सत्कार समारंभ शाळा व्य. समिती अध्यक्ष श्री.रामदास आंबेलकर,सरपंच श्रीम.लतिका म्हाडेश्वर,शिक्षण विस्तार अधिकारी श्री.गवस, शशिकांतजी तिरोडकर, केंद्रप्रमुख सौ. जुहिली सावंत, मुख्याध्यापक श्री .विजय शिरसाट, श्री. विजय गोसावी, रघुनाथ चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सुरेश कुलकर्णी, श्री.राजेंद्र चौधरी.मुंबई यांच्या आर्थिक सहकार्यातून कु.चैतन्य सं.शिरसाट कु.मयुरेश गुरव,कु.ठाणेश संतोष चव्हाण,कु.प्रणय विजय वाळवे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
श्री.मनोहर महादेव परब, गावठाणवाडी तिवरे तसेच श्री.सहदेव
विठ्ठल परब, गावठाणवाडी तिवरे यांनी प्रत्येकी एका मुलीचे पालकत्व स्वीकारले. श्री.शशिकांत तिरोडकर यांनी एका मुलीला दत्तक पालक योजनेंतर्गत पालकत्व जाहीर केले.
मा.श्री.गवस म्हणाले, श्री.संतोष म्हाडेश्वर हे कोविड काळात या गावाला-शाळेला लाभलेले एक समाजसेवी व्यक्तिमत्व आहे.त्यांच्या प्रेरकतेने अनेक सेवाभावी माणसे या शाळेला जोडली जात आहेत,अशा गौरवपूर्ण शब्दात कौतुक केले.तिवरे शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहेत.नाविन्यपूर्ण उपक्रमात ही शाळा अग्रेसर आहे.देणगीदार दात्यांच्या या सामजिक बांधिलकीचे मन:पूर्वक कौतुक केले.
श्री.तिरोडकर यांनी कोविड काळात हा सुंदर कार्यक्रम आयोजित करुन आम्हाला या थोर कार्यात सहभागी होण्याचा मान दिलात अशा शब्दात कौतुक केले. श्री.म्हाडेश्वर हे सामाजिक कार्याचा पूल बांधत मनामनांना जोडण्याचे काम करत आहेत. श्रीम.जुहिली सावंत यांनी सर्व दाते व प्रेरक श्री.म्हाडेश्वर यांचे कौतुक केले.शाळा बंद,शिक्षण सुरु उपक्रमांतर्गत खालचीवाडी शाळेने ऑनलाइन/ऑफलाईन शिक्षणासोबत विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत यश प्राप्त केले.कोविड योद्धयांस पत्र लेखन, इग्रंजी-मराठी कविता गायन, गोष्टींचा शनिवार,स्वाधाय उपक्रम, चित्रकला,रांगोळी,निबंध अशा अनेक स्पर्धांचे आयोजन केले.या सोनेरी क्षणांची मी घटक आहे.अशा गोड शुभेच्छा दिल्या.
यावेळी सौ.वेदिका परब,सौ.मनिषा गोसावी,सौ.दिपीका सुतार,व्य स.सदस्य.पालक.श्री.संतोष शिरसाट,श्रीम.गुरव,श्रीम.विजवाळवे.श्रीम.सावंत,श्री.परब ,श्रीम.शिवानी म्हाडेश्वर,श्री.श्रीधर म्हाडेश्वर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संदिप कदम यानी तर प्रास्ताविक श्री.हेमंत राणे व आभार श्री .विजय मेस्त्री यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page