कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या ७३ जागांसाठी २७ प्रभागांमधून २१६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील ८ अर्ज अवैध ठरले तर २०८ अर्ज वैध ठरले आहेत.

यात गोवेरी ग्रामपंचायतीत २३ पैकी २३ अर्ज वैध ठरले, वाढोस मध्ये २९ पैकी २९ वैध, गोठोस मध्ये २० पैकी २० वैध, कुपवडे मध्ये २६ पैकी २६ वैध,वसोली मध्ये १६ पैकी १५ वैध ठरले तर प्रभाग क्रमांक १मध्ये १ अवैध ठरला.वाडोस ग्रामपंचायतीमध्ये २९ पैकी २९ वैध ठरले या ग्रुपमध्ये प्रभाग क्रमांक ३ मध्य ऐका सदस्याला लेखापरीक्षण मधील विषयावर आक्षेप घेतला मात्र येथील निवडणूक निर्णय अधिकारी श्री बाणे यांनी आक्षेप घेणार्‍याकडून खात्रीदायक पुरावा न आल्याने हा आक्षेप फेटाळून लावत अर्ज वैध ठरवला. आकेरी ग्रामपंचायत मध्य ३५ पैकी ३५ अर्ज वैध ठरवले.माड्याचीवाडी ग्रामपंचायतीत २५ पैकी २२ वैध तर ३ अर्ज अवैध ठरवले. पोखरण कुसबेमध्ये २३ पैकी २० अर्ज वैध ठरवत ३ अवैध ठरवले. माड्याचीवाडी मध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये रंजना राजन गोडे यांचा अर्ज अवैध ठरल्याने कांचन चंद्रकांत डिचोलकर या बिनविरोध झाल्या आहेत. तर पोखरण कुसबे मध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये विजय सोनू महाडेश्वर हे बिनविरोध झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page