वैभववाडी तालुक्यातील 13 ही ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविणार – नासीर काझी

वैभववाडी तालुक्यातील 13 ही ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविणार – नासीर काझी

 • मांगवली ग्रामपंचायत बिनविरोध भाजपाकडे –
  वैभववाडी : तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणूका 15 जानेवारीला होणार आहेत. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहणार आहे. 13 ही ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकविणार आहे.मांगवली ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.या ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आलेली आहे अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे चे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी दिली.वैभववाडी भारतीय जनता पक्षाचे कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. यावेळी भाजपा जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे, भाजपा माजी तालुका अध्यक्ष अरविंद रावराणे ,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष किशोर दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
  पुढे काझी म्हणाले, तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीमध्ये 103 जागांसाठी निवडणूक होणार आहे .यामध्ये 28 ग्रा .प .सदस्य भाजप पक्षाचे बिनविरोध निवडून आलेले आहेत. 4 जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.तो पर्यत हा आकडा दुप्पट होईल.
  वैभववाडी तालुक्यातील 13 गावांमध्ये निवडणुका आहेत त्या गावांतील विरोधी पक्षाचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात आपल्याला प्रवेश द्यावा अशी मागणी करीत आहेत.त्यांना भाजपा मध्ये प्रवेश दिला जाणार आहे. वैभववाडी तालुक्यातील अनेक दिग्गज भाजप पक्षांमध्ये येत्या दोन दिवसात प्रवेश करणार आहेत .त्यांना आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश दिला जाणार आहे .भाजप पक्षाची वाटचाल जिल्ह्यातील आठ तालुक्या पेक्षा वैभववाडी तालुक्यामध्ये शतप्रतिशत भाजप तालुका म्हणून वाटचाल सुरू आहे.
  काही गावातील विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून भाजप पक्षाच्या उमेदवार यांना धमक्या दिल्या जात आहेत .विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, त्यामुळे विरोधक आमच्या उमेदवारांना धमक्या देत आहेत. अशा धमक्यांना भाजप भीक घालणार नाही, आमचे नेतृत्व सक्षम आहे .निवडणुकीमध्ये भाजपाचे तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामाणिक काम करत आहेत, त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील 13 ही पंचायतीवर भाजप वर्चस्व राहणार आहे.
  भाजप पक्षाचे बिनविरोध आलेले सदस्य मांगवली ग्रा पं – सदस्य सौ सुवर्णा चंद्रकांत लोकम, स्नेहल राजेंद्र राणे ,अक्षता अनंत आयरे ,विशाल सखाराम राणे ,महेश रामदास संसारे, शिवाजी नानू नाटेकर, वैभवी प्रशांत पांचाळ ,
  *वेंगसर ग्रा.पं *- दत्ताराम राजाराम बेळेकर,अक्षता गणपत सकपाळ ,नीलम बाळकृष्ण कांबळे, संध्या संदीप घाडी ,समाधान दत्‍ताराम गुरव ,सुगंधा रघुनाथ मंचेकर,
  भुईबावडा रिंगेवाडी ग्रामपंचायत सदस्य – कल्याणी केशव देसाई, स्वप्नाली गजानन देसाई , ग्रामपंचायत ऐनारी – मेघा मंगेश गुरव, समीक्षा सतीश गुरव ,प्रकाश शिवाजी गुरव ,
  *सांगुळवाडी ग्रामपंचायत सदस्य *- वंदना विलास लाड , पूजा जितेंद्र रावराणे , राहुल भास्कर जाधव, नाधावडे ग्रामपंचायत सदस्य- ऋतुजा संदीप यादव ,श्रीरंग महादेव पावसकर, लीना रमाकांत पांचाळ ,आदिती अनिल नारकर,
  *कुंभवडे ग्रामपंचायत सदस्य- *शिल्पा रवींद्र सावंत, मिलिंद विजय गुरव ,कोकिसरे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप रामचंद्र नारकर हे सर्व सदस्य भाजपचे बिनविरोध निवडून आलेले आहेत.अशी माहिती काझी यांनी दिली .

अभिप्राय द्या..