वेंगुर्ला तालुक्यात एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला तालुक्यात एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यातील आडेली (खुटवळवाडी) येथील १ व्यक्ती (वय ६४) कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. काल आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आलेल्या कोरोना रॅपिड टेस्ट मध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.त्या व्यक्तीस होम आयसोलेशन करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या ९ व्यक्तींना वेंगुर्ले येथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. काल दुपारी संबंधित घरांचा भाग कंटेंटमेंट करण्यात आला असून तालुक्यात आता सक्रिय रुग्णसंख्या एकूण ३ एवढी आहे. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्रियपणे काम करीत असून कोरोनाच्या या कालावधीत नागरिकांनी मास्क,सॅनिटायझेशन,गर्दीत जाणे टाळणे आदी शासन कोरोना नियम पाळून विशेष काळजी घ्यावी,असे आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..