हडपीड स्वामी समर्थ मठ येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न

मसुरे

देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे दत्त जयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी गणेश पुजन,पादुका पूजन, पुण्यवाचन, नामस्मरण, अभिषेक, होमहवन आदी कार्यक्रम झाले. यानंतर दिगंबरा दिगंबरा स्वामी समर्था दिगंबरा च्या गजरात पालखी सोहळा संपन्न झाला. दुपारी महाआरती झाल्या नंतर महाप्रसाद, लघुरुद्र आदी कार्यक्रम झाले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व निर्देश पाळून सर्व कार्यक्रम झाले.कार्यक्रमाचे औचित्य साधून मठातील स्वामी मूर्ती आकर्षक फुलांनी सजविले होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरीचे अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर यांच्या सह सर्व पदाधिकारी, तसेच गाव समिती सदस्य व स्वामी भक्तांनी मेहनत घेतली.

अभिप्राय द्या..