नेरूर येथिल यश चव्हाण आणि साईल गवस यांचा रूपेश पावसकर यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश..

नेरूर येथिल यश चव्हाण आणि साईल गवस यांचा रूपेश पावसकर यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश..

कुडाळ /-

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत दाखल झालेले,नेरूर जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात युवा वर्गाची मोठी फौज असलेले युवानेंते रुपेश पावसकर यांनी आपल्या समर्थकांचा व ईतर पक्षातील कार्यकत्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश घेत शिवसेना पक्षासाठी एक चांगले योगदान रुपेश पावसकर देत आहेत.आज रुपेश पावसकर यांच्या उपस्थितीत व नेरूर येथील चिन्मय पोईपकर यांच्या नेतृत्वाखाली नेरूर मधील युवा यश चव्हाण,साईल गवस या तरूणांचा कुडाळ -मालवण चे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश झाला.पुढे रुपेश पावसकर म्हणाले की अजून काही युवक वर्ग आपल्या संपर्कात आहेत,आपण त्या युवकांचा योग्य वेळी शिवसेनेत प्रवेश करून घेईन अशी आमदार वैभव नाईक यांना रुपेश पावसकर यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..