कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत विविध प्रस्तावांबाबत राष्ट्रीयकृत बँकांची आढावा बैठक सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आयोजित कऱण्यात आली आहे. हि बैठक उद्या गुरुवार दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी दुपारी २.०० वाजता ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील ज्या उद्योजकांचे बँकांसंदर्भात काही प्रश्न असतील तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे.