वेंगुर्ला –

वेंगुर्लामध्ये नगरसेवक विधाता सावंत यांचेतर्फे प्रभागातील ख्रिस्ती बांधवांना नाताळ भेट देण्यात आली.
नाताळ २०२० सणाचे औचित्य साधून वेंगुर्ला शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील काँग्रेसचे नगरसेवक , सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेसचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष विधाता सावंत यांनी घरोघरी जाऊन ख्रिस्ती बांधवांना भेटून त्यांना भेटवस्तू देऊन नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या.वेंगुर्ले नगरपालिका हद्दीत प्रभाग क्रमांक ३ मध्ये सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक विधाता सावंत यांच्या पुढाकाराने व काँग्रेसच्या वतीने सलग चार वर्षे गणेश चतुर्थी ,दिवाळी,ईद व नाताळ या सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना भेट वस्तू देण्यात येत आहेत. सणाच्या निमित्ताने प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांना भेटून त्यांच्या समस्या सोडविणे व नागरिकांशी थेट संपर्क ठेवणे या काँग्रेसच्या उपक्रमा मुळे नागरीकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page