श्री सोमेश्वर सोसायटीचे व्हाईस चेअरमन लवू धर्णे यांचे निधन

श्री सोमेश्वर सोसायटीचे व्हाईस चेअरमन लवू धर्णे यांचे निधन

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील आडेली गावठणवाडी (फौजदारवाडी) येथील रहिवासी,श्री सोमेश्वर देवस्थानचे मानकरी,श्री सोमेश्वर सोसायटीचे व्हाईस चेअरमन, देवस्थान कमिटीचे सदस्य लवू महादेव धर्णे (वय ८०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात मुली,जावई, नातवंडे, चुलत भाऊ,पुतणे असा मोठा परिवार आहे.ते एक मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेले आडेली गावातील विविध धार्मिक तसेच सामाजिक उपक्रमात क्रियाशील होते.

अभिप्राय द्या..