वेंगुर्ला
नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी म्हणून ख्याती पावलेल्या वजराट येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार २६ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.यावेळी सकाळपासून केळी, नारळ ठेवणे,ओटी भरणे आदी धार्मिक कार्यक्रम, रात्री पालखी प्रदक्षिणा व नाईक मोचेमाडकर दशावतार कंपनीचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.सर्व धार्मिक कार्यक्रम शासन कोरोनाचे नियम पाळून भक्तीमय वातावरणात संपन्न होणार असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन गावकर सूर्यकांत परब यांनी केले आहे.