वजराट ग्रामपंचायतीचे उदघाटन २८ डिसेंबर रोजी

वजराट ग्रामपंचायतीचे उदघाटन २८ डिसेंबर रोजी

वेंगुर्ला
जनसुविधा योजना व १४ वा वित्त आयोग अंतर्गत बांधण्यात आलेल्या तालुक्यातील
वजराट ग्रामपंचायतीचे उदघाटन २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता खासदार नारायण राणे यांच्या हस्ते व पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.या कार्यक्रमास आमदार दिपक केसरकर, जि.प.अध्यक्ष समिधा नाईक,जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर,मु.का.अधिकारी हेमंत वसेकर, पं. स.सभापती अनुश्री कांबळी,जि.प.सदस्य नितीन शिरोडकर,पं. स.सदस्य यशवंत परब आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास उपस्थित रहावे,असे आवाहन सरपंच महेश राणे व उपसरपंच नितीन परब यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..