वेंगुर्ला

वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथील सामाजिक कार्यकर्ते अजित नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मठ येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले.यावेळी एकूण ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.सलग दहा वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या रक्तदान शिबिराचे जि.प.अध्यक्षा समिधा नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदअध्यक्षा समिधा नाईक,भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळु देसाई,भाजपा वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,मठ सरपंच तुळशीदस ठाकुर,उपसरपंच निलेश नाईक, माजी सरपंच किशोर पोतदार,मठ सोसायटी माजी व्हाईस चेअरमन रविंद्र खानोलकर,कविता मठकर,महेश गवंडे,बाबी वेतोरकर,भाजप कोकण विकास आघाडी जिल्हाप्रमुख प्रमोद उर्फ बबन खोत,जिल्हा सचिव युवामोर्चा प्रसाद खोत, मनोहर गावडे,बचत गट ग्रामसंघ अध्यक्षा वैभवी पोतदार,ग्रा. पं. सदस्या लक्ष्मी परब, मेघा तेंडोलकर, प्राजक्ता धुरी,महेश्वरी गवंडे,आरोग्य कर्मचारी विजय आम्बेरकर,आरोग्यसेवक धुरी, गंगावणे, सुशीला आईर,रक्त संक्रमण कर्मचारी – ओरोस,ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page